Sharada Vyapari Grahak Sanman Yojana

Shree Sharada Sahakari Bank Ltd., Pune    07-Jul-2020
Total Views |

अ.क्र.

तपशील

नियमावली

1

कर्ज योजना नांव

हि विशेष योजना '' शारदा व्यापारी ग्राहक सन्मान योजना '' कर्ज / कॅश क्रेडीट (रोखपत मर्यादा) '' म्हणून संबोधण्यात येईल.

2

कर्ज योजना कोणासाठी

हि कर्ज/कॅश क्रेडीट (पत मर्यादा) योजना छोटे /मोठे व्यवसायिक, व्यापारी,बांधकाम कंत्राटदार, अन्य कंत्राटदार,पुरवठादार यांचे साठी राहील.

3

पात्रता निकष

A)स्वत:चे अथवा वडिलोपार्जित घर किंवा स्वत:ची व्यवसायाची जागा असावी.

B) सातत्याने किमान तीन वर्ष व्यवसाय केलेला असावा

4

शेअर्स

संरक्षित कर्ज रकमेच्या 2.5% व असंरक्षित कर्ज रकमेच्या 5.00% भाग भांडवल म्हणून घेणे आवश्यक यासाठी प्रथम किमान रु. 2,000/- चे भाग घेणे बंधनकारक राहिल उर्वरित रक्कम तीन समान मासिक हप्त्यात भरणा करणे बंधनकारक राहील.

5

कर्ज / रोखपत मर्यादा

योजने अंतर्गत अर्जदार यांचे मागील तीन वर्षातील रिसीट (सरासरीच्या) च्या कमाल 40% रक्कम मंजूर करता येईल. (रु.1,00,000/- कमाल मर्यादा रु.25,00,000/-)असंरक्षित कर्ज जास्तीत जास्त रु.2,00,000/- )

6

आर्थिक पत्रके

आर्थिक वर्ष 16-17, 17-18, व 18-19, सादर करणे आवश्यक अर्थसहाय्य मंजुरीसाठी मार्च 2019 अखेरची आयकर विवरण पत्रानुसारची स्थिती विचारात घेण्यात येईल तथापि आर्थिक वर्ष 2019-2020 ची तात्पुरती आर्थिक पत्रके (अगदीच शक्य नसल्यास वार्षिक खरेदी / विक्री, उधारी येणे / देणे वर्क ऑर्डर च्या प्रती बँक दप्तरी घेण्यात याव्यात.) मात्र माहे जुलै, सप्टेंबर 2020 अखेर अथवा शासकीय निर्णयानुसार लागू असलेल्या मुद्तीपासून 15 दिवसाच्या आता मार्च 2020 अखेरची अंतिम आर्थिक पत्रके बँक दप्तरी सादर करणे बंधनकारक राहील.

7

नफा /तोटा

व्यवसायास मागील तीन वर्षात नफा मिळालेला असावा, किमान कॅश लॉस नसावा.

8

व्यवसायातील भांडवल

अर्जदार व्यक्ती/संस्था यांचे व्यवसायातील भांडवल सकारात्मक असावे.

9

D.S.C.R.(डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो)

प्रस्तावित कर्जासाठी (योजना कालावधी पर्यंत.) D.S.C.R. (डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो) 1.50:1 च्या वर विचारात घेण्यात येईल.

10

सिबिल CIBIL

A) सिबिल CIBIL स्कोअर किमान 600 इतका असणे आवश्यक.

   

B) सिबिल CIBIL स्कोअर 600 पेक्षा कमी असल्यास मंजुरीचे अधिकार संचालक मंडळास राहातील. (स्कोअर कमी असल्याबाबत कारण व तपशील / पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.)

11

कर्ज कालावधी

A) मुदती कर्ज कालावधी 48 महिने इतका राहील

   

B) रोखपत मार्यादेसाठीची मुदत 12 महिने इतकी राहील. त्यानंतरचे नुतनीकरण सर्वसाधारण रोखपत मर्यादा योजने अंतर्गत व त्यासाठी लागू असणाऱ्या व्याज दराने होवू शकेल.

12

व्याज दर

संरक्षित कर्जासाठी/ रोखपत मर्यादेसाठी व्याज दर द.सा. द.शे. 9.00% इतका राहील.

असंरक्षित कर्जासाठी व्याज दर द.सा. द.शे. 10.00% इतका राहील.

 

प्रोसेसिंग फी

प्रोसेसिंग फी 1.00% + G.S.T.

13

कर्ज दस्त/ कागदपत्र पूर्तता

नियमा नुसार सर्व दस्त/ कागदपत्र पूर्तता करून देणे बंधनकारक राहील,दस्त नोंदणी साठीची आवश्यक फी बँकेकडे जमा करणे आवश्यक राहील.

14

योजना कालावधी

सदर योजना दि. 30/09/2020 पर्यंत कार्यान्वित राहील.

15

मोरटोरियम (आधीस्थगन कालावधी)

मुदती कर्जासाठी मागणी केल्यासच मोरटोरियम (आधीस्थगन कलावधी) {आवश्यक असल्यास}कमाल 6 (सहा) महिने इतका राहील. व्याज रकमेसाठी मोरटोरियम (आधीस्थगन कलावधी) राहणार नाही कर्ज अदा केल्या पासून ते मोरटोरियम (आधीस्थगन कलावधी) पिरीयड मधील खात्यावर नावे पाडलेले व्याज दरमहा स्वतंत्ररित्या भरणा करणे बंधनकारक राहील.

16

अर्जदार यांचे व्यवसायाचे जागेस शाखा भेट

शाखेने कर्ज शिफारस करते वेळी अर्जदार यांचे व्यवसायाचे जागेस कर्ज मंजुरी पूर्व भेट द्यावी. तसेच कर्ज अदा झाल्यानंतर कर्ज / व्याज परतफेडीमध्ये अडचण निर्माण होत आहे असे लक्षात आल्यास योग्य वसुली पर्याया बाबत माहिती घेण्यात यावी व मुख्य कार्यालयास त्याची माहिती द्यावी.

17

जामीनदार

अर्थसहाय्यासाठी दोन सक्षम जामीन देणे आवश्यक. खातेदारांनी यापूर्वी मुदती कर्ज/पत मर्यादा घेतली असल्यास मूळ अर्थसहाय्या साठीचे जामीनदार कायम राहतील. (क्रॉंस जामीन देण्यास परवानगी राहील.)

18

तारण

स्थावर तारणाबाबत बँक मान्यता प्राप्त विधिज्ञ यांनी सुचविलेल्या सर्व कागद पत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील.

19

दुरावा / Margin

A)स्थावर तारण : डिस्ट्रेस व्हॅल्युच्या 20%

B)आपल्या बँकेत यापूर्वी किमान तीन वर्षे खाते असून सतत Performing खाते असल्यास मार्केट व्हॅल्युच्या (बाजार मूल्याच्या ) 20%

20

टर्म/ जीवन विमा पॉलिसी

किमान कर्ज रकमे इतकी टर्म/ जीवन विमा पॉलिसी काढून ती कर्जा साठी तारण घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

21

मंजूर रक्कम वितरण (टप्पे)

अर्जदार यांनी विनंती केल्यास मंजूर मुदती कर्जाची रक्कम मंजूर केल्यापासूनच्या पहिल्या तीन महिन्यांत तीन टप्प्यात वितरीत करण्याची सोय उपलब्ध राहील.

22

रक्कम विनियोग बाबत

रु.2,00,000/- लाखांचे कर्जा साठी मंजूर रक्कम खर्चाबाबत सेल्फ डीक्लरेशन विचारत घेण्यात येईल तथापि मंजूर रक्कम जास्त असल्यास रक्कम विनियोग बाबत पुरावा सादर करणे आवश्यक.किंवा सदर रक्कम चेक अथवा R.T.G.S. /TRANSFAR /N.E.F.T. द्वारे अदा करण्यात येईल. मंजूर रकमेच्य 25% इतकी रक्कम वैयक्तिक /कौटुंबिक खर्चासाठी खाते जमा करता येईल.

23

खात्यातील उचल

पत मर्यादा खात्यातील उचल व्यवसायातील खर्चासाठीच करता येईल.

24

अर्थसहाय्य / कर्ज मुदतपूर्व बंद करणे

सदर अर्थसहाय्य / कर्ज मुदतपूर्व बंद करणे / जादा रक्कम भरणे अपेक्षित नाही तथापि खातेदारास त्याचे व्यावसायिक उत्पन्नातून कर्ज मुदतपूर्व बंद करावयाचे असल्यास त्यास ते कर्ज घेतल्यापासून नऊ महिन्यानंतर करता येईल अन्यथा नियमित कर्ज फेडी नुसारच्या होवू शकणार्या व्याजाच्या 50% इतके किमान व्याज भरणे आवश्यक राहील.

25

कर्ज मंजुरी अधिकार

यापूर्वीच्या मंजुरी अधिकारानुसार कायम राहतील.